Monday, May 19, 2014

मोदी उदय ,पण पुढे काय ?

शेवटापासून सुरवात करावी तर Most Awaiting 'निकाल' काय लागला हे वेगळं सांगायला नको ,
समस्त भारताच्या इतिहासात लोकांच्या म्हणण्यानुसार जी 'लाट' , नाही ' लाट ' नको 'त्सुनामी' म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, तर या लाटेने अगदी मोठे राष्ट्रीय , प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीने संपवले त्याचा पूर्व-इतिहास अगदी 'नवा' आहे .




   जो भाजप पक्ष गेले अनेक वर्ष सरकार स्तापणेची स्वप्नं पाहत होतं, ती गोष्ट 'एकट्या ' मोदीने  कशी काय गेल्या १-२ वर्षात साध्य केली असावी ?  यामागे Modi Branding वगेरे वगेरेआलंच , परंतु एकीकडे 'कॉंग्रेस'ची झालेली गत आणि पडलेली पत यातून कॉंग्रेस स्वतः सावरू शकला नाही . याचाच फायदा मोदी वर बनणारे जोक्स, अब कि बार ... चा नारा Youth साठी Daily Dose झाला.

कॉंग्रेस बद्दल सांगायचा झालं तर ,२०१० मध्ये झालेला स्पेक्ट्रम घोटाळ्य पासून झालेली सुरवात न थांबता कोळसा, कॉमनवेल्थ , निर्भया , अण्णा हि सर्व प्रकरण Comman Man च्या लक्षात येत होती.  परंतु कॉंग्रेस ने भाजप वर निशाणा साधला तो 'secularism' वरून , पण सर्वसामान्य नागरिकाला यात काही रुची नसायची, त्याला सिलेंडर, पेट्रोल यांचे वाढलेले भाव याचा राग होता, आणि हाच राग मतपेटीतून बाहेर पडला.




अश्यातच , भाजप ने Marketing Strategy ,भाजप-केंद्रित ऐवजी मोदी-केंद्रित करून  'अब कि बार भाजप...' नसून 'अब कि बार मोदी सरकार ' आणि  'कॉंग्रेस मुक्त भारत ' हा अगेंडा ठेवला, याचा निष्कर्ष म्हणून जनतेने एकट्या भाजप ला २८७ खासदार आणि NDA लं ३३७ खासदार मिळवून दिले. जनतेचा एवढा मोठा कौल , कदाचित भाजप साठी सुद्धा अनपेक्षित होता.
एकेकाळी बहुमतात असणारे बिहार , यु.पी मध्ये असणार्या  (भाजप सोडून गेलेल्या )नितीश  सरकारला  आणि अखिलेश सरकार लं २-३ एवढेच  खासदार मिळाले, याचा परिणाम जनतेला लवकरच राजीनामा शस्त्र मधून दिसेल.

इकडे महाराष्ट्रात देखील परिस्थिती अशीच ओढवली ,मग ते पवारखेळी  असो कि मनसे factor किवा आप सगळे संपले, दुसरीकडे भाजप सोबत असणार्या 'शिवसेनेने' मात्र या मोदी लाटेत नुसते हातच धुतले नाहीत तर पूर्ण आंघोळच केली आणि त्यांचे १९ खासदार निवडून आले.

शेवटी प्रश्न उरतो एकच , पुढे काय ?
मोदी संघाचा रेमोट बनतील ? , भाजप स्वताचं घर सावरतील ? नरेंद्र मोदी हे दुसरे व्लादिमिर पुतीन होऊ पाहतील ? कॉंग्रेस चा झालेला ऐतिहासिक पराभव पचवून आता राहुल ऐवजी 'प्रियांका'चं Launching होणार ?
 निकालानंतर  गायब झालेले पवार यावर काय  खेळी करतात? कारण विधानसभा जवळ येतेय , UP च्या विजयाचा 'सूत्रधार'   'अमित शहा '  म्हणे इकडे येणार आहे.
तोपर्यंत महाराष्ट्रात) राजीनामे नाही पडले तर नवलंच !





1 comment:

  1. kahi Gosti Kharya aslya tari modi Pudhil 6-8 Mahinyat je Nirnay ghetil tyavar MAHARASHTRA vidhan sabha Avalambun asel.... tyat kahi shanka nahi ki modi tya veli maharashtrat nakki laksha ghaltil... pann tya velas Pawar dekhil tevdyach kadavat avhan taiyar kartil... Aani vijay haBJP chach asel :P

    ReplyDelete